येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
टीम MBP Live24 - शहराचा मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये अतिक्रमण, वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि मूलभूत सुविधांच्या (Basic Needs) अभावाच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.
नालेगाव (Nalegaon) अमरधामपासून दिल्लीगेट वेशीमार्गे (Delhi Gate) झेंडीगेटपर्यंत (Zendigate) पसरलेल्या या व्यापारी पट्ट्यात अरुंद रस्ते, पार्किंगचा (Parking) अभाव, दुकानदारांचा रस्त्यावरचा पसारा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या (Public Toilets) कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
अशी आहे या प्रभागाची व्याप्ती : देशमुख गल्ली (Deshmukh Galli), मानकर गल्ली (Nabkar Galli), नालेगाव हडको, रोहोकले (Rohokale) गल्ली, वाघ (Wagh) गल्ली, अमरधाम, तुंगार गल्ली, टांगे गल्ली, शहाजी गल्ली, पानसरे गल्ली, कापड बाजार, डाळ मंडई, गंज बाजार, गाडगीळ पटांगण, रंगार गल्ली, गांधी मैदान (Gandhi Maidan), नवी पेठ, एम. जी. रोड (M G Road), सराफ गल्ली, जुना दाने डबरा, झेंडीगेट परिसर.
जिल्हाभरातील नागरिक खरेदीसाठी येणाऱ्या या मुख्य बाजारपेठेत पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापड बाजार, गंजबाजार, एम.जी. रोड, सराफ गल्ली, डाळ मंडई, जुना दाने डबरा अशा गजबजलेल्या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे झाली असून पथदिवेही व्यवस्थित दिसतात.
पाणीपुरवठा (Pipeline) आणि भुयारी गटार याबाबत तक्रारी कमी असल्या तरी मुख्य बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा मोठा प्रश्न असून भाजी विक्रेत्यांचे चितळे रोडवरील अतिक्रमण वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे.
अतिक्रमण, वाहतूक गोंधळ (Traffic Management) आणि स्वच्छतेच्या समस्या वाढल्याने अनेक रहिवाशांनी उपनगरांचा रस्ता धरल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
या प्रभागातील मुख्य समस्या :
भाजीमंडई ओस, विक्रेते रस्त्यावर :
- गंज बाजारातील महापालिकेची महात्मा फुले भाजी मंडई ओस पडली.
- भाजी–फळ विक्रेते मंडईऐवजी बाहेर रस्त्यावर ठेले लावतात.
- बहुतांश दुकानदारांनीही दुकानाबाहेर अतिक्रमण करून रस्ता अडवला आहे.
- पादचाऱ्यांना जाण्यास जागा नसल्याची गंभीर समस्या.
तीनही पोलिस चौक्या बंद :
- मंगलगेट, चितळे रोड व गंज बाजारातील पोलिस चौक्या अनेक वर्षांपासून बंद.
- परिसरात चोरीच्या घटना वाढल्या.
- व्यापाऱ्यांची चौक्या पुनश्च सुरू करण्याची मागणी.
पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी नाही :
- कापड बाजारात पथविक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले.
- महापालिकेकडून पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी नाही.
- दुकानदारच स्टॉलधारकांना दुकानासमोर जागा देऊन भाडे आकारतात.
- यामुळे वाहतूक कोंडी वाढते.
रस्त्यांची कामे रखडली :
- पटवर्धन चौक–चितळे रोड आणि गौरी घुमट परिसरातील रस्त्यांना मंजुरी मिळूनही काम रखडले.
- रस्ते खोदून ठेवले असल्याने नागरिकांना त्रास.
गांधी मैदानाची दुरवस्था :
- शहरातील मध्यवर्ती व एकमेव मोठे मैदान असलेल्या गांधी मैदानाची अवस्था जीर्ण.
- खुले व्यासपीठदेखील खराब झाले.
या प्रभागातील नागरिक म्हणतात :
- गंजबाजारातील रस्त्यांची दुरवस्था
- पावसात पाणी साचते.
- अतिक्रमण मोठी अडचण.
- आडते बाजार, डाळ मंडईत दिवसभर जड वाहनांची वर्दळ
- सतत गर्दी–कोंडी. जड वाहनांना रात्रीच प्रवेश द्यावा.
- गंजबाजारातील सार्वजनिक शौचालय नूतनीकरण झाले
- परंतु सर्व युनिट सुरू नाहीत.
- स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाचा त्रास कायम.
- डाळ मंडई परिसरात जड वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी.
