अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग ५ झोपडपट्टीबहुल वसाहत)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - झोपडपट्टीबहुल प्रभाग पाचची दयनीय अवस्था झाली आहे. मूलभूत सुविधांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नगरातील (Ahilyanagar) नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील झोपडपट्टीबहुल परिसर अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थनगर, लालटाकी, भारस्कर कॉलनी, रामवाडी, गोकुळवाडी तसेच तारकपूरमधील इंदिरा कॉलनी या भागात पाणी, गटारी, पथदिवे, रस्ते आणि स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी MBP Live24 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.

अशी आहे प्रभागाची व्याप्ती : लालटाकी चौक, अप्पू हत्ती गार्डन, वहाडणे हॉस्पिटल सर्जेपुरा चौक, सिद्धार्थनगर, भगत मळा, सिंधी कॉलनी, प्रकाशपूर, जिल्हा रुग्णालय, विराज कॉलनी, गोविंदपुरा, कराचीवालानगर, गोकुळवाडी.

महापालिकेच्या नवीन प्रभागरचनेत या प्रभागात सुमारे ७० टक्के झोपडपट्टी क्षेत्र समाविष्ट झाले आहे. पूर्वीच्या प्रभाग दहातील भागांसह सिद्धार्थनगर आणि तारकपूर परिसराचीही भर यात झाली आहे. उत्तर–दक्षिण व पूर्व–पश्चिम दिशांनी मोठ्या व्यापाचा हा प्रभाग आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ते व पथदिवे बसविण्यात आले असले, तरी बहुतांश भागात अद्यापही मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते.

सिद्धार्थनगर, लालटाकी, भारस्कर कॉलनी आणि इतर भागातील नागरिकांनी नियमित घंटागाडीचा अभाव, पाण्याचा अपुरा दाब आणि बंद पडलेले पथदिवे याबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून विकासाच्या आश्वासनांचा भार सोसत असलेल्या या भागातील रहिवाशांना तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय म्हणतात नागरिक ?

  • भारस्कर कॉलनी : 
  • पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही
  • भागाची नियमित स्वच्छता होत नाही
  • कचरा गाडी नियमित येत नाही

  • सिद्धार्थनगर :
  • उघड्या गटारीमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे
  • अरुंद रस्त्यांमुळे अंतर्गत भागात कचरा गाडी जात नाही
  • त्यामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या
  • महापालिका कर्मचाऱ्यांकडून सफाई वेळेत होत नाही
  • रामवाडी : 
  • सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
  • अनेक ठिकाणी पथदिवे बंद
  • बहुतांश ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही
  • रहिवाशांचा मूलभूत सुविधांसाठी सतत संघर्ष

प्रभागातील प्रमुख समस्या -

1) सर्जेपुरा चौकातील खोदलेला रस्ता :

  • दिवाळीपूर्वी रस्ता खोदून ठेवला असून काम ठप्प
  • सर्जेपुरा चौकातून कोठला व तारकपूरकडे जाताना वाहनचालकांना मोठी कसरत
  • चौकात वाहनांच्या रांगा व वाहतूक कोंडी

2) मोकळ्या भूखंडांवर साचलेले पाणी :

  • लालटाकी–भारस्कर कॉलनी झोपडपट्टी परिसरातील मोकळ्या भूखंडांवर मैलामिश्रित पाण्याचे डोह
  • डोहांमुळे अस्वच्छता व आरोग्यधोका

3) मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग : 

  • सिद्धार्थनगरसह अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले
  • यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला
  • दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास

4) उघड्या गटारींचा धोका : 

  • सिद्धार्थनगर, लालटाकी–भारस्कर कॉलनी, रामवाडी, गोकुळवाडी येथे उघड्या गटारी
  • नियमित सफाई नसल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर
  • दुर्गंधी आणि अपघातांची शक्यता

5) अतिक्रमणांचा गंभीर प्रश्न :

  • अनेक भागात रस्त्यावर अतिक्रमणे
  • अंतर्गत वसाहतीतील नागरिकांना ये-जा करताना अडचणी
  • नागरिकांकडून महापालिकेने तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणी

6) पाणीपुरवठ्याची समस्या : 

  • महापालिकेचे पाणीपुरवठा असूनही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही
  • अनेक वेळा दूषित पाणी येत असल्याची रहिवाशांची तक्रार

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !