‘रीलस्टार’ मराठी चित्रपटाचा प्रामाणिक रिव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा 

योगिता सुर्यवंशी-नळे - नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट (Marathi Cinema) ‘रीलस्टार’ (Reelstar) बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना या चित्रपटाचा स्पष्ट आणि प्रामाणिक रिव्ह्यू (Movie Review) एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील वाढत्या प्रयोगशीलतेच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओमध्ये कथा (Screenplay), अभिनय (Acting), दिग्दर्शन (Direction), संगीत (Music) आणि एकूणच सिनेमाचा अनुभव अत्यंत सोप्या आणि थेट भाषेत प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. या रिव्ह्यूमध्ये चित्रपटाची कथा नेमक्या शब्दांत उलगडून सांगितली आहे.

तसेच कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचा परिणामकारक पद्धतीने आढावा घेतला आहे. दिग्दर्शनातील गती, कथानकाची मांडणी आणि संगीताने निर्माण केलेले वातावरण यावरही संतुलित भाष्य केले आहे. सिनेमाच्या ताकदवान आणि कमकुवत बाजू प्रामाणिकपणे मांडल्याने हा रिव्ह्यू वास्तवदर्शी (Realistic) व मार्गदर्शक (Inspiring) ठरतो.

मराठी चित्रपट पाहण्यापूर्वी रिव्ह्यू बघण्याची सवय असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ विशेष उपयुक्त ठरणार आहे. रीलस्टार पाहायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्यात हा रिव्ह्यू मदत करणार असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये तो पाहण्याकडे कल वाढत आहे.

मराठी सिनेमातील नव्या प्रयोगांविषयी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी हा रिव्ह्यू नक्की पाहावा, असे आवाहन व्हिडिओ निर्मात्यांकडून करण्यात आले आहे. सोबतच्या लिंकमध्ये दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करुन रिव्ह्यु पहा आणि तो कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आमचे मुव्ही रिव्ह्युज पाहात राहण्यासाठी आमचे यु ट्युब चॅनल (You Tube) सबस्क्राईब करा.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !