अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग ८ बोल्हेगाव गांधीनगर)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - बोल्हेगावातील (Bolhegaon) गांधीनगर (Gandhinagar) भागाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असून पाणीपुरवठा, रस्ते (Road), कचरा व्यवस्थापन (Wastage) आणि ड्रेनेज (Dranage) या मूलभूत सुविधांचा (Basic Needs) गंभीर अभाव कायम असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक सातमधील हा परिसर मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमध्ये समाविष्ट झाला होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत या भागात आवश्यक विकासकामे (Development) न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. गांधीनगरमधील रस्त्यांवरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून ठिकठिकाणी खोल खड्डे (Patholes) पडले आहेत.

पाणी (Drinking Water) पुरेशा वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. कचरा गाडी अपवादानेच येते, तर अनेक भागात ड्रेनेज लाईनच नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. नैसर्गिक ओढे बुजल्याने सांडपाणी टाकण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली.

सन २०१८ मध्ये प्रभाग आठमध्ये समावेश झाल्यानंतर या भागाचा विकास होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तत्कालीन महापौरांचा प्रभाग असूनही विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. आता नव्या प्रभागरचनेत बोल्हेगावसह संपूर्ण भाग पुन्हा प्रभाग क्रमांक आठमध्ये एकत्र आल्याने प्रशासकीय एकसंधता झाली आहे.

तरी अद्यापही मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवला गेलेला नाही. आगामी लोकप्रतिनिधींकडून तो सुटावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

काय म्हणतात नागरिक ?

  • कचरा संकलन विस्कळीत : 
  • बोल्हेगाव परिसरात मोठी लोकवसाहत असूनही नियमित कचरा संकलन नाही
  • रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
  • अनेक दिवस घंटागाडी येत नाही

  • ड्रेनेजची समस्या : 
  • अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच नाही
  • सांडपाणी कुठे सोडायचे हा मोठा प्रश्न
  • पाणीपुरवठ्याचा गंभीर अभाव : 
  • पाणी कधी दिवसाआड तर कधी ४–५ दिवसांनी
  • नळकनेक्शन असूनही काही घरांत पाणीच येत नाही
  • रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था : 
  • गांधीनगर भागात रस्तेच नाहीत
  • सर्वत्र खोल खड्डे
  • पावसाळ्यात पायी चालणेसुद्धा अवघड
  • पथदिवे व सार्वजनिक सुविधा ठप्प : 
  • पथदिवे बंद, अंधाराची समस्या
  • कोणतीही देखभाल नाही
  • नगरसेवकांकडून दुर्लक्ष : 
  • प्रभागात नगरसेवक फिरकल्याचे नागरिकांना आठवत नाही
  • नव्या नगरसेवकांकडून विकासाची अपेक्षा
  • शेजारील बोल्हेगावशी तफावत : 
  • बोल्हेगावात प्रत्येक कॉलनीत सिमेंटचे रस्ते
  • गांधीनगरमध्ये मात्र फक्त खड्डे आणि उद्ध्वस्त रस्ते
  • कचरा संकलनाचा अभाव : 
  • नियमित घंटागाडी न आल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग
  • अस्वच्छता आणि आरोग्यधोका वाढतो
  • विकासकामांसाठी संघर्ष : 
  • बोल्हेगाव परिसरात अलीकडे रस्त्यांची कामे झाली, मोकळ्या भूखंडांचे सुशोभीकरण पूर्ण
  • पूर्वी अनेक वर्षे गणेश चौक–बोल्हेगाव रस्ता खोदूनच ठेवला होता
  • खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात
  • शहरातील इतर प्रभागांप्रमाणे त्वरित विकासकामे न मिळाल्याची रहिवाशांची खंत
  • भविष्यात आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा
  • पाणीपुरवठ्याची समस्या : 
  • फेज टू योजनेअंतर्गत टाक्या व पाईपलाईन असूनही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही
  • गांधीनगरसह बोल्हेगावातील अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता कायम
  • काही ठिकाणी बोगस कनेक्शन असल्याने नियमित कर भरत असलेल्या नागरिकांनाच पाणी मिळण्यात अडचणी

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !