'राष्ट्रवादी'ने रणशिंग फुंकले, 'विजय संकल्प मेळाव्या'मुळे तापले रणनितीचे वातावरण

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे आयोजित विजय संकल्प मेळावा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला शहरातील प्रमुख नेते, सेल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तरुण कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून पक्षाच्या ताकदीचा परखड संदेश दिला.

जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीशी संलग्नतेसह लढण्याचा विचार असून, गरज पडल्यास पक्ष स्वबळावरही लढण्यास सक्षम आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळेल, याची हमी दिली.

शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हटले की, निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर लढविली जाणारी असेल. १७ प्रभागांमध्ये महाविकास आघाडी व मित्रपक्षांसोबत लढण्याचा विचार आहे, तसेच वेळ आली तर स्वबळावरही लढण्यास पूर्ण तयारी आहे. विधानसभेत पक्षासोबत निष्ठा राखणाऱ्यांना योग्य संधी दिली जाईल.

बैठकीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शवून आपली ताकद सिद्ध केली. विजय संकल्प मेळाव्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची सक्रिय तयारी आणि रणनिती अंतिम करण्याची प्रक्रिया आता जोर धरत आहे, त्यामुळे राजकीय उत्सुकतेत वाढ झाली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !