अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग १६ केडगाव)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - केडगावमधील (Kedgaon) प्रभाग क्रमांक १६ मध्ये नागरिक अनेक वर्षांपासून पाणी (Water), रस्ते (Road), गटार आणि स्वच्छतेच्या मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत. नगर-पुणे मार्गाच्या उजव्या बाजूला वसलेल्या या प्रभागात भूषणनगर, जुने केडगाव गावठाण, शिवाजीनगर, अंबिकानगर, शाहूनगर, माधवनगर, मोतीनगर आणि ओंकारनगर अशा दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींचा समावेश आहे.


पण मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या (Water Tanks) असूनही नळाचे पाणी चार-पाच दिवसांतूनच येते आणि तेही कमी दाबाने. अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था अजूनही अनेक भागात कार्यरत नाही, तर कचरा संकलनही अपुरे चालते.

अशी आहे प्रभागाची व्याप्ती : केडगावमधील भूषणनगरपासून केडगाव बायपास चौकापर्यत पसरलेल्या या प्रभागात जुने केडगाव गावठाण, भूषणनगर (Bhushan Nagar), शिवाजीनगर (Shivaji Nagar), अंबिकानगर (Ambika Nagar), शाहूनगर (Shahu Nagar), माधवनगर (Madhav Nagar), मोतीनगर (Moti Nagar), ओंकारनगर (Omkar Nagar) अशा मोठमोठ्या वसाहतींचा या प्रभागात समावेश होतो.

केडगावमधील अग्निशमन दलाचे (Fire Brigade) कार्यालय बंद असून ते फक्त पार्किंगसाठी (Parking) वापरले जाते. भाग्योदय मंगल कार्यालय (Bhagyoday Mangal Karyalay) चालवता न आल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. बसस्थानक परिसर (Bus Stand), शाहूनगरकडे जाणारा पाचगोडावून (Pach Godown) परिसर आणि झेंडा चौक परिसर (Zenda Chawk) भाजीबाजारामुळे गजबजलेले आहेत.

सार्वजनिक सुविधा (Public Service) सुधारणेच्या बाबतीत शंभो गार्डनसारख्या (Shambho Garden) अनेक ठिकाणांची देखभाल अनेक वर्षांपासून होत नव्हती; मात्र सध्या येथे साफसफाई सुरु आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या आहेत प्रमुख समस्या :

  • ड्रेनेजची कमतरता :
  • श्रीकृष्णनगर, राधाकृष्ण कॉलनी, वैष्णवनगर, अंबिकानगरच्या काही भागात सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही.
  • काही नागरिकांनी हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर सोडले आहे.

  • सार्वजनिक शौचालयांची अवस्था :
  • मनपाने या प्रभागात नगर-पुणे मार्ग व केडगाव-नेप्ती मार्गालगत सार्वजनिक शौचालये केली होती.
  • याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शौचालयांना सध्या कुलपे लागली आहेत.
  • सुवर्णानगर येथील लहान मुलांच्या खेळण्यांसाठी झाडाझुडपांचा वेढा आहे.

  • रस्त्यांची दुरवस्था :
  • अंबिकानगर ते शाहूनगरपर्यंतचा मुख्य रस्ता तीन वर्षे रखडला होता.
  • प्रभागातील जुने केडगाव सोडले तर बाकी सर्व भाग पक्क्या रस्त्यांपासून वंचित आहेत.
  • अंबिकानगर, भूषणनगर, शाहूनगर, माधवनगर येथील रस्ते खड्डेमय व हाडे खिळखिळे करणारे आहेत.

  • कचरागाडीची कमतरता :
  • कचरागाडी येतेच की नाही याचा भरवसा नाही; घराबाहेर कचरा राहतो.
  • सफाई कर्मचारी काही ठरावीक भागातच सफाई करतात.

  • भाजीबाजाराचा गोंधळ :
  • अंबिकानगर बसस्थानक परिसर, शाहूनगरला जाणारा पाच गोडावून परिसर, झेंडा चौक परिसर भाजीबाजाराने गजबजलेला आहे.
  • विक्रेते आणि खरेदीदार रस्त्यावर गाड्या उभ्या करून नागरिकांचा मार्ग अडवत आहेत.

  • शंभो गार्डन व उद्यानांची अवस्था :
  • प्रभागातील मोकळे भूखंड झाडे झुडपांनी व्यापले आहेत.
  • नवीन उद्यान नाहीत; जुनी उद्याने जिवंत राहिली नव्हती.
  • महिलांसाठी ओपन जीम बेवारस होती; सध्या शंभो गार्डनची साफसफाई सुरू आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !