अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग १० मुख्य शहर)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - गावठाण हद्दीत असलेला प्रभाग क्रमांक १० आजही गंभीर समस्यांनी वेढलेला असून नागरिकांचे दैनंदिन हाल वाढले आहेत. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था (Dameged Roads), वारंवार तुंबणाऱ्या ड्रेनेज लाईन्स, रस्ते व इमारतींवर लोंबकळणाऱ्या केबल्स (Cables) आणि बहुतांश भागात अस्वच्छतेचे वातावरण अशा अडचणी कायम आहेत.

पाणीटंचाईही (Drinking Water) रहिवाशांच्या चिंतेचा विषय ठरली आहे. पद्मशाली, मुस्लीम, दलित समाजासह कामगार, मध्यवर्गीय आणि व्यापारी वस्ती असलेल्या या प्रभागात मूलभूत सुविधांची पूर्ण अंमलबजावणी न झाल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे.

रुपवते रोड (Rupwate Road), मोहनबाग–नानाजी मठ, दादासाहेब विद्यालय परिसर, सर्जेपूरा (Sarjepura), अप्पु हत्ती चौक (Appu Hatti Chawk), एसटी वर्कशॉप (ST Workshop), रामवाडी पेट्रोल पंप, कोठला रोड (Kothla Road) ते फलटण पोलिस चौकी (Faltan Police Chauki) असा विस्तृत पट्टा या प्रभागात येतो. तसेच झेंडीगेट, आडते बाजार, दाळमंडई रस्ता, एम.जी. रोड व चौपाटी कारंजा (Chaupati Karanja) हा व्यापारी भागही यात समाविष्ट आहे.

प्रभागातील तोफखाना, झेंडीगेट आणि मंगलगेट परिसरात काही सिमेंट रस्त्यांची कामे झालेली असली तरी रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूकधारकांचे हाल होत आहेत. याशिवाय मंगलगेट व आडते बाजारातील जीर्ण इमारती धोकादायक ठरत असून तातडीने कारवाईची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ही कामे झाली :

  • मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण
  • रस्ते, चौकांत पथदिवे बसविले
  • काही भागात फेज टू लाइनमधून पाणी
  • नवीन ड्रेनेज लाइनचे कामे झाली

ही कामे अजूनही बाकी :

  • सर्व भागात हवे पूर्ण दाबाने पाणी
  • अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती
  • सर्व ठिकाणी हवे फेज टू मधून पाणी
  • नियमित स्वच्छता
  • वेळोवेळी ड्रेनेज स्वच्छता, दुरुस्ती
  • सार्वजनिक शौचालयांची गरज

या प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख तक्रारी :

रस्त्यांची दुरवस्था व अपूर्ण कामे :

  • डॉ. गरगडे चौकासमोरील रस्ता फेज-२ लाईनसाठी खोदून ठेवला; दुरुस्ती नाही.
  • झेंडीगेट परिसरात रस्त्यांची मोठी दुरवस्था; सर्वत्र कचरा.
  • तेलीखुंट चौकात रस्त्याच्या कडेला खोदलेला खड्डा कायम, अपघाताचा धोका.
  • नाला खोदला पण पुन्हा बुजवला नाही; वाहतूकधारक त्रस्त.

धोकादायक केबल्स आणि पथदिवे बंद :

  • झाडांवर अस्ताव्यस्त लोंबकळलेल्या केबल्स जीवघेण्या.
  • सौरऊर्जेवरील बहुतांश पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य.
  • अनेक भागांत पथदिव्यांची नियमित दुरुस्ती होत नाही.

ड्रेनेज आणि स्वच्छतेची समस्या :

  • अनेक ठिकाणी चेंबर तुंबलेले;
  • महापालिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष.
  • स्वच्छतेची कामे नियमित न होत असल्याने रस्त्यावर कचरा साचलेला.

पाणीपुरवठ्याचा प्रश्न :

  • बहुतांश ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही.
  • फेज-२ लाइन टाकूनही पाणी जुन्या लाइनमधूनच येत असल्याची तक्रार.

नागरिकांची मागणी :

  • मनपाच्या मोकळ्या भूखंडावर खुले जिम उभारण्याची मागणी; दखल नाही.

धोकादायक इमारती :

  • मंगलगेट, आडते बाजार, झेंडीगेट, तोफखाना भागांत काही जीर्ण इमारती.
  • महापालिकेने ‘धोकादायक’ फलक लावले तरी इमारती न पाडल्याने धोका कायम.
  • पावसाळ्यात कोसळण्याची भीती; तातडीने पाडकामाची मागणी.

अवैध व्यवसाय :

  • तोफखाना परिसरात पत्ते क्लब, मटका, बिंगो यांसारखे जुगार अड्डे.
  • परिसरात शाळा असूनही अवैध धंदे सुरू; पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !