अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग ३ सावेडी)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - अहिल्यानगर महापालिकेच्या नवनिर्मित प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांना पायाभूत सुविधांच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागत आहे. खोदकामानंतर रखडलेली रस्त्यांची कामे, ओढ्यांमधून येणारी तीव्र दुर्गंधी आणि रात्रीच्या वेळी बंद पथदिव्यांमुळे पसरलेला अंधार.. या तिन्ही समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेच्या त्रिभाजनानंतर प्रभाग ३ मध्ये जुने प्रभाग ४ आणि ५ मधील मोठा भाग समाविष्ट झाला असून येथे उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य अशा तिन्ही समाजघटकांची लोकवस्ती आहे. सरकारनगर, अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, राजमाता कॉलनी, सिव्हिल हडको परिसरात सिमेंट रस्ते पूर्ण झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

प्रभाग तीनची व्याप्ती : सहकारनगर, अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, वर्षा कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, नवलेनगर, एल.आय.सी कॉलनी, गजानन महाराज मंदिर, बीएसएनएल एक्स्चेंज, समतानगर, रेस्ट हाऊस, झालानी हॉस्पिटल, सिक्युएव्ही, सिव्हिल हडको कॉलनी, महापालिका कार्यालय परिसर.

सर्वाधिक वाहतूक असलेला गुलमोहर रस्ता मागील काही वर्षांपासून रखडलेलाच आहे. या रस्त्यावर अद्याप पथदिवे बसविले नसल्याने अंधाराचे साम्राज्य असून, फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा आणि चेन स्नॅचिंगचा धोका कायम आहे.

तारकपूर रोड–मिस्कन मळा–सावेडी जॉगींग ट्रॅक मार्गावरील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. जॉगींग ट्रॅकमधील बहुतांश पथदिवे बंद असल्याने रात्री टारगट मुलांची गर्दी जमा होते, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रभागातील सुविधाची दुरावस्था पाहता, येथील विकास कामे गतीमान करण्याची नागरिकांची मागणी तीव्र होत आहे.

काय म्हणतात नागरिक ?

  • गुलमोहर रस्ता रखडलेला : अनेक वर्षे खराब; काम सुरू झाले तरी पूर्णत्व नाही. पथदिव्यांसाठी खड्डे करून तसेच सोडले; हेच खड्डे आता अडथळा.
  • रात्री अंधाराचे साम्राज्य : गुलमोहर रोडसह परिसरातील बहुतांश पथदिवे बंद; रात्री मोठी वर्दळ असूनही प्रकाशयोजना नाही. ज्येष्ठ व महिलांना बाहेर पडणे कठीण.
  • कलानगरात मोकाट कुत्र्यांची दहशत : कुत्र्यांच्या टोळ्या दिवस-रात्र फिरताना दिसतात; वाहनचालकांचा पाठलाग किंवा हल्ल्याच्या घटना. नागरिकांची महापालिकेकडे तक्रार.
  • गणेश चौक ओढ्यात कचऱ्याचा ढिगारा : मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून परिसरात प्रचंड दुर्गंधी.
  • ओढ्यांत सांडपाणी सोडण्याचा मुद्दा : ओढे व नाले मैलामिश्रित पाण्याने व्यापले; भुयारी गटार योजना तातडीने राबवावी, अशी मागणी.
  • बीएसएनएल ऑफिस–एकविरा चौक रस्ता ठप्प : काम सुरू झाले पण निधीअभावी अर्धवट; दळणवळण पूर्णपणे विस्कळीत.
  • रात्रीचे असुरक्षित वातावरण : पथदिवे नसल्याने चेन स्नॅचिंगचा धोका वाढला; मोकाट कुत्र्यांचा उपद्रवही कायम.
  • नागरिकांची मुख्य मागणी : गुलमोहर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे आणि पथदिवे त्वरित कार्यान्वित करावेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !