शेवगाव (अहिल्यानगर) - 'अभ्यास (Study), वर्गपाठ, गृहपाठ (Homework) आणि मार्क (Marks) हे म्हणजे शाळा (School) असा समज घातक असून विद्यार्थ्याच्या मानसिक व भावनिक विकासासाठी कला महत्वाची असते, अशी संधी उपलब्ध करून देणारी शाळा म्हणजे उत्तम शाळा असते, असे प्रतिपादन प्रख्यात माईम आर्टिस्ट (Mime Artist) संकेत खेडकर (Sanket Khedkar) यांनी येथे केले.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलच्या (Bharde Highschool) सांस्कृतिक विभागाच्या वतीने शाळेच्या अमृतहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांच्या मुकनाट्य प्रयोगाचे आयोजन आज शाळेत केले होते त्यावेळी ते बोलत होते.
मुकनाट्य म्हणजे कमी जागेत, कमी श्रमात, कमी वेळेत प्रभावी सामाजिक संदेश (Social Message) देणारी कला (Art) असून या कलेत उत्तम करिअर होऊ शकते,असेही ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत क्रिकेट (Cricket), नावेतून प्रवास (Travel), चारचाकी वाहन चालवणे अशा कृती करून घेत विद्यार्थ्यांना दीड तास खिळवून ठेवले.
यावेळी त्यांचा सत्कार प्राचार्य संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. निलेश मोरे, नितिन मालानी यांनी संयोजन केले. तर भारत नरोडे, बापू मोरे, सूर्यकांत तुजारे, सुरेश कुसळकर, नितीन शेळके आणि अर्जुन जाधव यांनी त्यांना सहाय्य केले.
