अभिनंदन ! मोहटादेवी देवस्थान ट्रस्टमध्ये ॲड. विक्रम वाडेकर यांची पुनर्नियुक्ती


अहिल्यानगर - अखिल महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मोहटादेवी देवस्थान ट्रस्टच्या (Mohata Devi) विश्वस्तपदी ॲड. विक्रम वाडेकर (Adv Vikram Wadekar) (नोटरी पब्लिक) यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी मागील कार्यकाळात दिलेले अमूल्य योगदान विचारात घेऊनच त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर ॲड. वाडेकर यांनी देवस्थान व गड परिसराच्या भावी विकासाबाबत सविस्तर चर्चा करत पर्यटन (Tourism) केंद्रित विकास पुढे नेण्याचा संकल्प मांडला. 

ॲड. वाडेकर यांनी सांगितले की, मोहटादेवी गडाची ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक संपन्नता लक्षात घेता येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येतात. त्यामुळे परिसराचे नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात रूपांतर करण्याची गरज आहे.

ॲड. वाडेकर यांनी पुढील संकल्प केलेल्या योजनांमध्ये गड परिसराचे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून उभारणी, सुटसुटीत व्यवस्थापन, भाविकांसाठी अधिक सुविधायुक्त व भव्य भक्तनिवास, दर्शनासाठी सुलभ मार्ग, स्वच्छता, या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

सुरक्षाव्यवस्था आणि मूलभूत सुविधा, परिसराचा हरित विकास, तसेच वाढीव पार्किंग, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था अशा सुविधांचा विस्तार, देवस्थानाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अधिकाधिक सामाजिक उपक्रम या गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे.

गडावरच्या ऐतिहासिक रचनेचा वारसा (Historical Structure), पावित्र्य (Dignity) याची जपवणूक व संवर्धन करण्यालाही तेवढेच महत्त्व दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

या सर्व उपक्रमांसाठी चेअरमन, विश्वस्त मंडळ, देवस्थान कर्मचारीवर्ग, इतर सामाजिक संस्था (NGO) तसेच मोहटा गावातील ग्रामस्थांचे सक्रीय सहकार्य घेतले जाईल, असेही ॲड. वाडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ॲड. विक्रम वाडेकर यांच्या पुनर्नियुक्तीमुळे देवस्थानाचा सर्वांगीण विकास या पुढील काळात अधिक गतिमान होईल, अशी आशा ग्रामस्थ आणि भाविकांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.

ॲड. वाडेकर यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून तसेच भाविकवर्गाने उत्स्फूर्त  स्वागत केले. अहिल्यानगर वकील संघाने  (Bar Association) त्यांना विशेष शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !