अहिल्यानगर - थंडीच्या दिवसांत शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना आपुलकीची उब मिळावी या उद्देशाने आरोग्यम बहुउद्देशीय फाउंडेशनने (Aarogyam Foundation) समाजोपयोगी उपक्रम राबविला.
‘चला तर आरोग्यम सोबत : एक मायेची उब, आपल्या माणसांकडून आपल्या माणसांसाठी’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद (ZP School) प्राथमिक शाळा डोंगरगण (मांजरसुंबा) तसेच विळद, देहरे व शिंगवे येथील शालेय विद्यार्थ्यांना स्वेटरचे (Sweater) वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासोबतच शिक्षणाबाबत सकारात्मक प्रेरणा मिळाली. समाजाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्येही विशेष स्वागत झाले.
यावेळी आरोग्यम बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष कोमल घोडके, कल्याणी डोळसे, मुकूंद घोडके, मनोज कापरे, आर्किटेक्ट कॉलेजचे प्राचार्य सुहास चौधरी तसेच संबंधित शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आरोग्यम फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९२७२७४००३७ या क्रमांकावर संदेश (SMS) पाठवावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
