येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
पिंपरी चिंचवड - शहरात आयोजित करण्यात आलेल्या रेबीजमुक्त पिंपरी चिंचवड चित्रकला स्पर्धेत वेदिका निलेश नेब ही विद्यार्थिनी प्रथम आली. ती यमुनानगर (निगडी) येथील शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे.
मिशन रेबीज इंडिया (Mission Rebeis India), एम एस डी ॲनिमल हेल्थ (MSD Animal Health) व पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpari Chindchwad Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मिशन रेबीज इंडियाच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमधून ही स्पर्धा (Drawing Competition) घेण्यात आली.
रेबीज या आजाराविषयीची सखोल माहिती (Information) व त्यापासून बचावाचे उपाय वेदिका नेब (Vedika Neb) हिने आपल्या चित्रामध्ये सांगितले होते. तिच्यासोबत शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात तिचा प्रथम क्रमांक (First Rank) आला आहे.
पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यसभागृहात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि. २ डिसेंम्बर रोजी उत्साहात पार पडला. प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मेडल, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते वेदिकाचा सन्मान करण्यात आला.
वेदिका नेब हिला लहानपणापासून चित्रकलेची प्रचंड आवड आहे. नुकतीच तिने एलिमेंट्री परीक्षाही दिलेली आहे. तिला चित्रकला शिक्षक अमृता भोईटे, वर्गशिक्षिका मृणाल धसे, मुख्याध्यापक सविता बिराजदार, तसेच पालक रोहिणी व निलेश नेब यांचे मार्गदर्शन लाभले.
मिशन रेबीज इंडिया व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

