जाणीव फाऊंडेशनतर्फे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन


अहिल्यानगर - रुग्णांची वाढती रक्ताची गरज लक्षात घेऊन जाणीव फाऊंडेशनच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सरत्या २०२५ या वर्षाचा शेवट एक पुण्यकर्म करून करण्याची सुवर्णसंधी युवक-युवतींना उपलब्ध झाली आहे.

'दारूच्या बाटल्या रित्या करण्यापेक्षा, रक्ताच्या पिशव्या भरुया' या सामाजिक संदेशासह हे रक्तदान शिबीर बुधवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत छत्रपती शंभुराजे चौक, प्रगती डेअरीजवळ, श्रीराम चौक, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

आज अनेक गरीब व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहेत. ही गरज ओळखून जाणीव फाऊंडेशनच्या माध्यमातून नियमितपणे रक्तदान शिबिरे घेतली जातात.

रक्तदान हे जीवनदान असते आणि एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेष म्हणजे, सर्व रक्तदात्यांना आकर्षक व जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत. 

जाणीव फाऊंडेशनचे सदस्य वर्षातून किमान तीन वेळा रक्तदान करतात आणि समाजात रक्तदानाची चळवळ उभी करत आहेत. या पुण्यशील उपक्रमात जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन रक्तदान करावे व इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन जाणीव फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदीप वाखुरे – 9075877777
राहुल जोशी – 9860006006
ॲड. विक्रम वाडेकर – 9823577722
शंतनु पांडव – 9422222108
ॲड. व इंजी. कैलाश दिघे – 9822304881
विकास जोशी – 7588115560
सचिन निक्रड – 9822446486
विकास गायकवाड – 8379833802
संदीप रोडे – 9423162300
महेंद्र नांदुरकर – 9028057438
संजय माने – 9850916111
दिपक भंडारी – 9225811213
सतीश शिंदे – 7350333303
सुभाष बांगर – 9552885069
कैलाश गाडे – 9970520777
राहुल काळे – 9623029395
आशिष वेळापुरे – 9823083308
शिवशर्मा चेमटे – 9822403213
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !