'ब्लॉसमिंग ऑलमंड' मराठी चित्रपटाची केरळ International Folklore Film Festival साठी निवड


अहिल्यानगर - येथील स्थानिक तरुणांनी निर्मिती केलेल्या ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाने (Marathi Film) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर (International Recognition) अभिमानाचा झेंडा फडकावला आहे.


केरळ (Kerala) येथे होणाऱ्या International Folklore Film Festival या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची अधिकृत निवड जाहीर झाली आहे.

लोककथांवर, नातेसंंबधांच्या जिव्हाळ्यावर आणि सांस्कृतिक परंपरेवर आधारीत सिनेमांची निवड (Marathi Cinema International Selection) हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून यंदाचे हे नववे वर्ष आहे.

केरळमध्ये 15 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणार आहे. देश-विदेशातील प्रेक्षक व समीक्षकांसमोर ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ (Blossoming Almond Marathi Film) ही मराठी कलाकृती झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना (Nehal S Ghodke) विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आधीच मिळालेली आंतरराष्ट्रीय निवड व गौरव : याआधी या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महोत्सवांत (Marathi Film Korea Best Writer Award) स्वतःची उपस्थिती नोंदवली आहे.

  • सहावा CIFF International Film Festival – बांगलादेश
  • पाचवा Egyptian American Film Festival – अमेरिका

तसेच गत ऑगस्ट महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या 11व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ साठी दिग्दर्शक नेहाल एस. घोडके यांना Best Writer हा विशेष पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लेखणीतून उतरलेली कथा, पटकथा आणि संवाद यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे.

चित्रपटाची टीम – प्रतिभेची ताकद
लेखन व दिग्दर्शन - नेहाल एस. घोडके
पटकथा सल्लागार - अनंत काळे
छायाचित्रण - सचिन गायगोवे
संपादन - अमोल सुरुणकर

कलाकार - मनीषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्याय, निवृत्ती गर्जे, जानवी लटके, अंजली कोंडावर, रावसाहेब अलकुटे, प्रणित मेढे

अन्य सहकारी
सहदिग्दर्शक – अमोल सुरुणकर
छायाचित्रण संचालक – सचिन गायगोवे
सहाय्यक – मयुर आहेर, कराळे शुभम, रिजवान सय्यद
लाईटिंग – सचिन गायगोवे, दिनेश सुतार, रिजवान सय्यद
वेशभूषा व मेकअप – श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे, सोनिया लोटके
ध्वनी – शुभम एम. कराळे, दिनेश सुतार
कास्टिंग – निवृत्ती गर्जे, पुरुषोत्तम उपाध्याय
कार्यकारी निर्माते – अमोल के. सुरुणकर, नेहाल एस. घोडके
मीडिया पार्टनर – MBP Live24

केरळ महोत्सवाचे वैशिष्ट्य - International Folklore Film Festival हा जगातील लोकपरंपरा, वारसा, मानवी संबंध आणि त्यातील भावनिक पदर यांच्या कथांना प्राधान्य देणारा आगळा वेगळा महोत्सव आहे. फक्त मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचे सिनेमात दिसणारे दृश्यांकन हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे.

अहिल्यानगरच्या तरुणांचा जागतिक प्रवास - मराठी सिनेमाला नवा आयाम देत जिल्ह्यातील तरुणांची निर्मिती आज जगभर चर्चेत आहे. 'ब्लॉसमिंग ऑलमंड' या सिनेमाला मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी (Local Talent) प्रेरणादायी मैलाचा दगड ठरत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !