पुणे - चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व दुसऱ्या गुन्ह्यात पॅरोलवरून (Parol) फरार (Absconded) सराईत आरोपी अखेर बाणेर पोलीसांच्या (Baner Police) पथकाने मुंबईतून जेरबंद केला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (Chandrashekhar Sawant) यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बाणेर पोलीस स्टेशनमध्ये एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुकानात काम करणारा नौकर निलेश विष्णू कदम (वय ३१, रा. दुरशेट, खांबेवाडी, ता. खालापुर, जि. रायगड) याने कॅश बॉक्स (Cash Box) मधून नगदी १५ हजार रुपये व दोन मोबाईल असा एकूण ₹२९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून फरार झाला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासातून उघड झाले की आरोपी कमी पगारात दुकानांत नोकरी करून त्याच ठिकाणी चोरी करून पसार होण्याची त्याची सराईत पद्धत (Modes Oprendy) आहे. त्याच्यावर यापूर्वी विश्रामबाग पोलीस स्टेशन तसेच कणकवली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
कणकवलीतील गुन्ह्यात तो शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवरून फरार झाल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने आरोपी मुंबईत दडून बसल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तपास पथक मुंबईत रवाना केले.
या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव व पोलीस अंमलदार आहेर, शिंगे यांनी मुंबई गाठून आरोपीला शोधून दिनांक १० डिसेंबर रोजी अटक केली. आरोपीने चोरीचे मोबाईल राज्याबाहेर विक्री केल्याचे तपासात समोर आले असून पुढील तपास पोलीस अंमलदार आहेर यांच्याकडे आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिक्षेत्र ४ चुलूमुला रजणीकांत, सहायक पोलीस आयुक्त खडकी विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या टीमने केली.
या पथकात पीआय (गुन्हे) अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव, गणेश रायकर, तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, गणेश गायकवाड, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, प्रतिमा निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रविण गव्हाणे, रोहित पाथरुट, स्वप्नील मराठे यांचा समावेश होता.

