अहिल्यानगर महापालिकेच्या रणांगणात महाविकास आघाडी सज्ज ! १७ प्रभागांत एकत्रित लढत

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) जोरदार तयारी करत १७ प्रभागांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (NCP Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) या तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अधिकृत AB फॉर्म देत उमेदवारी निश्चित केली.

या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक ३२ जागांवर उमेदवारांना AB फॉर्म देत मैदानात उतरवले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २४ जागांवर, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने १४ जागांवर आपले उमेदवार (Candidate) निश्चित केले आहेत.

तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याचे स्पष्ट संकेत या घोषणेतून मिळत आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी नमूद केले. आघाडीतील एकजूट, निश्चित उमेदवारी आणि शेवटच्या दिवशी झालेले AB फॉर्मचे वाटप पाहता, येणारी महानगरपालिका निवडणूक (Municipal Corporation Election) अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रचाराच्या रणधुमाळीत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !