अहिल्यानगर - येथील प्रथितयश फौजदारी वकील अॅड. सतीशचंद्र सुद्रिक (Advocate Satishchandra Sudrik) यांना त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय न्यायसेवेबद्दल राष्ट्रीय पातळीवरील साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार (Award) जाहीर करण्यात आला आहे.
ओम साई विकास प्रतिष्ठान, नगर (Om Sai Vikas Pratishthan) यांच्या वतीने हा पुरस्कार शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री साईबाबांच्या पावन व पवित्र भूमीत शिर्डी (Shirdi) येथे प्रदान करण्यात येणार आहे.
अॅड. सुद्रिक गेल्या ४५ वर्षांपासून कायदे क्षेत्रात कार्यरत असून फौजदारी कायद्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांत त्यांनी सत्य, न्याय आणि नैतिक मूल्यांची कास धरत प्रभावी व अभ्यासपूर्ण कामगिरी बजावली आहे.
सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच तरुण वकिलांना दिलेले मार्गदर्शन यामुळे त्यांचा नावलौकिक केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर पसरलेला आहे.
त्यांच्या सामाजिक जाणिवेतून केलेल्या विविध उपक्रमांमुळेही त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या पुरस्काराच्या घोषणेनंतर कायदे क्षेत्र, सामाजिक संस्था, राजकीय व शैक्षणिक वर्तुळातून अॅड. सुद्रिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा सन्मान म्हणजे न्यायालयीन क्षेत्रातील अॅड. सतीशचंद्र सुद्रीक यांच्या निष्ठावान सेवेला मिळालेली योग्य पावती (Proper Recognition) असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
