येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप युतीने आपली पूर्ण उमेदवार यादी जाहीर करत निवडणुकीची रणधुमाळी सुरू केली आहे. शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये युतीकडून उमेदवार देण्यात आले आहेत.
दोन्ही पक्षांनी संतुलित वाटप केल्याचे चित्र आहे. काही प्रभागांत भाजपने तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. अनुभवी पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच नव्या चेहऱ्यांचा समन्वय साधत युतीने मजबूत उमेदवार उभे केल्याने निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) – भाजप युती : प्रभागनिहाय उमेदवार यादी
- प्रभाग १ : डॉ. सागर बोरुडे (रा.), शारदा ढवण (भा.), ज्योती ढवण (रा.), दीपाली बारस्कर (रा.), संपत बारस्कर (रा.)
- प्रभाग २ : रोशनी भोसले (भा.), महेश तवले (रा.), संध्या पवार (रा.), निखील वारे (भा.)
- प्रभाग ३ : उषा नलावडे (भा.), गौरी बोरकर (रा.), ज्योती गाडे (रा.), ऋग्वेद गांधी (भा.)
- प्रभाग ५ : काजल भोसले (रा.), धनंजय जाधव (भा.), हरप्रीतकौर गंभीर (रा.), मोहित पंजाबी (रा.)
- प्रभाग ६ : मनोज दुल्लम, सोन्याबाई शिंदे, सुनीता कुलकर्णी, करण कराळे (सर्व भाजप)
- प्रभाग ७ : वर्षा सानप, पुष्पा बोरुडे, वंदना ताठे, बाबासाहेब वाकळे (सर्व भाजप)
- प्रभाग ८ : सुनीता भिंगारदिवे (रा.), आशा कातोरे (भा.), कुमारसिंह वाकळे (रा.), बाबासाहेब नागरगोजे (रा.)
- प्रभाग ९ : किरण दाभाडे (रा.), पद्मा बोरुडे (भा.), सीमा शिंदे (रा.), महेश लोंढे (भा.)
- प्रभाग १० : महेंद्र बिज्जा, शीतल ढोणे, मयुरी जाधव, सागर मुर्तडकर (सर्व भाजप)
- प्रभाग ११ : सागर शिंदे (रा.), विकास वाघ (भा.), दीप्ती गांधी (भा.), आशा डागवाले (रा.), सुभाष लोंढे (भा.)
- प्रभाग १२ : आरती रासकर, संध्या घोलप (रा.), अमोल निस्ताने, शुभा तांबोळी (भा.)
- प्रभाग १३ : सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, अविनाश घुले (सर्व राष्ट्रवादी)
- प्रभाग १४ : प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, गणेश भोसले (सर्व राष्ट्रवादी)
- प्रभाग १५ : पौर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे (रा.), दत्तात्रेय गाडळकर, सुजय मोहिते (भा.)

