येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (INC) आपले उमेदवार जाहीर करत निवडणूक तयारीला गती दिली आहे. विविध प्रभागांमध्ये काँग्रेसने एकूण १४ उमेदवार मैदानात उतरवले असून, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
शहरातील महत्त्वाच्या तसेच अल्पसंख्याकबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसने (Congress) उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही यादी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार – प्रभागनिहाय यादी
- प्रभाग क्र. २ : अभिनय लालेशकुमार गायकवाड
- प्रभाग क्र. ३ : आशिष रमेश ढेपे
- प्रभाग क्र. ४ : शेख नसीम खानसाहेब, शेख फयाजोद्दीन अजीजोद्दीन, खान मीनाज जाफर, खान शम्स समीउल्ला
- प्रभाग क्र. ५ : शीला दीप चव्हाण
- प्रभाग क्र. ९ : दीप नारायण चव्हाण
- प्रभाग क्र. १२ : चंद्रकांत रतनलाल भंडारी
- प्रभाग क्र. १३ : अक्षय राजेंद्र शिंदे
- प्रभाग क्र. १४ : डॅनियल संतोष घरखाढवे, सुरेखा संतोष घरवाढवे
- प्रभाग क्र. १६ : अॅड. विशाल बबन पठारे, गणेश महादेव भोसले

