आघाडीत नाराजीचा स्फोट ! मनसे स्वबळावर मैदानात, आठ जागांवर उमेदवार

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठा राजकीय ट्विस्ट (Political Twist) पाहायला मिळाला आहे. जागावाटपात अपेक्षित प्रभाग डावलल्याचा आणि वाटाघाटींमध्ये सन्मान न ठेवल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) (MNS) महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करत आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुंबईत उद्धवसेना आणि मनसे यांची आघाडी झाल्यानंतर अहिल्यानगरमध्येही उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेससोबत मनसेला आघाडीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

सुरुवातीला मनसेने २० जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडी टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने ही मागणी कमी केली. तरीही अंतिम टप्प्यात मनसेला नको असलेल्या प्रभागांमध्येच उमेदवार देण्याचा आग्रह करण्यात येत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अपेक्षित आणि ताकदीच्या प्रभागांमध्ये जागा न दिल्याने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी स्पष्ट केले. “आमच्या पक्षाला सन्मानजनक वागणूक मिळाली नाही, त्यामुळे स्वबळावर लढणे हाच पर्याय उरला,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव असल्याने त्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनसेचा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आणि उमेदवारीतील गोंधळामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मनसेचे उमेदवार – प्रभागनिहाय यादी

  • प्रभाग क्र. ३ : प्रवीण शिवनाथ गायकवाड
  • प्रभाग क्र. ७ : प्रशांत सुभाष जाधव
  • प्रभाग क्र. ९ : राणी दीपक दांगट
  • प्रभाग क्र. ११ : संतोष सुमित सहदेव, वासंती दत्तात्रय भंडारे, प्रभाग क्र. १५ : गणेश बबन शिंदे
  • प्रभाग क्र. १७ : राहुल जाधव, अंबरनाथ तुकाराम भालसिंग

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !