येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - महानगरपालिका २०२५–२०२६ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध प्रभागांमधून उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक ९ क (सर्वसाधारण महिला) गटातून शोभा राजू आल्हाट, प्रभाग क्रमांक १३ अ (अनुसूचित जाती राखीव – पुरुष) गटातून प्रितम प्रकाश कदम, तसेच प्रभाग क्रमांक १५ ड (सर्वसाधारण) गटातून फैरोज अब्दुलकरीम पठाण यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले मत मांडले. या प्रसंगी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, योगेश क्षीरसागर, प्रतीक ठोकळ, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

