28 लाखांची नोकरी सोडली, शून्य उत्पन्नाचा काळ झेलला; आज आहे स्वतःची कोट्यवधींची कंपनी


बेंगळुरू (Benguluru) - उच्च पगार (High Sallary), नामांकित कंपनी आणि सुरक्षित भविष्य सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर जाणे हे प्रत्येकाच्या जिवावर येणारे पाऊल असते. पण बेंगळुरूच्या चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयल (Meenal Goyal) यांनी हेच धाडस (Risk) करून दाखवले.

छायाचित्र : प्रतिकात्मक

KPMG आणि Deloitte सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये काम करत असताना मिळणारा 28 लाख रुपये वार्षिक पगार (Annual Income) त्यांनी मार्च 2023 मध्ये स्वेच्छेने सोडला (Resign) आणि स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सहा वर्षांचा अनुभव, स्थिर उत्पन्न आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा (Expectations) असूनही, “फक्त नोकरी (Job) नाही, तर काहीतरी स्वतःचे उभे करायचे” या ध्येयाने मीनल पुढे सरसावल्या. मात्र सुरुवात अत्यंत कठीण (Struggle) ठरली.

पहिल्या पाच महिन्यांत एकही रुपया उत्पन्न (Imcome) नव्हते. 12 लाखांची बचत (Saving) हळूहळू 4 लाखांवर आली. अनेक रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत मनात शंका, भीती आणि अपयशाची भीती घर करून बसायची.

याच संघर्षाच्या काळात Unacademy कडून मिळालेला 25 हजार रुपयांचा एक छोटासा फ्रीलान्स प्रोजेक्ट (Freelance Project) त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. रक्कम फारशी मोठी नव्हती, पण 'आपण योग्य दिशेने जात आहोत' याची खात्री देणारा तो पहिला विश्वास होता.

हाच क्षण त्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ देणारा ठरला. आज मीनल गोयल स्वतःची कंपनी यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांच्या कंपनीचे मासिक उत्पन्न सुमारे 5 लाख रुपये असून पाच जणांची टीम (Team) त्यांच्यासोबत कार्यरत आहे.

कॉर्पोरेट (Corporate World) जगतातील सुरक्षित शिडी सोडून त्यांनी निवडलेला हा खडतर मार्ग आज फलद्रूप होताना दिसत आहे. मीनल यांचा ठाम विश्वास आहे की 'तयारी कधीच पूर्ण होत नाही, आणि पुरेशी बचत कधीच वाटत नाही.'

माजी सहकारी जरी कॉर्पोरेट पदोन्नती घेत असले, तरी मीनल मात्र पूर्णपणे स्वतःच्या मालकीची, भविष्यात 100 कोटींची होऊ शकणारी कंपनी (Company) उभारत आहेत. त्यांचा हा प्रवास आज हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी (Inspiration) ठरत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !