स्वतःच्या वडिलांशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसेनेची निष्ठा शिकवू नका ! विक्रम राठोडांवर जोरदार हल्लाबोल

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - स्व. अनिलभैय्या राठोड (Anil Bhaiyya Rathod) यांनी आयुष्यभर मातोश्रीशी कधीही गद्दारी केली नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane) फुटले तेव्हाही अनिलभैय्यांना ऑफर (Offer) होती, मात्र त्यांनी शिवसेनेशी (Shivsena) एकनिष्ठ राहणंच पसंत केलं. मात्र त्याच वारशावर राजकारणात आलेल्या विक्रम राठोड यांना मिळालेलं आयतं सुद्धा सांभाळता आलं नाही, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील यांनी केली आहे.

त्यांनी आधी स्वतःच्या वडिलांशी आणि नंतर मातोश्रीशी गद्दारी केली, अशी घणाघाती टीका ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील (Ravaji Nangare Patil) यांनी केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी ठाकरे शिवसेनेवर केलेल्या टीकेचा नांगरे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.

विक्रम गेल्या तीन वर्षांपासून शिंदेंचे उंबरे झिजवत होते, भाजपचेही (BJP) दरवाजे ठोठावत होते, मात्र कुठेच दाद मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रवेशावेळी पुण्यात स्टेजवर बसायला खुर्चीही न मिळाल्याची आठवण करून देत नांगरे म्हणाले, त्यांच्या सोबत एकही शिवसैनिक नव्हता, ते एकटेच गेले.

स्व. अनिलभैय्यांच्या निधनानंतर शहर शिवसेनेचे नेतृत्व विक्रमांकडे होते, पण नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक त्यांना सोडून गेले. कोणतंच स्वकर्तृत्व उभं करता आलं नाही, असा टोला त्यांनी लगावला. ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाल्यावर मातोश्रीविरोधात गरळ ओकणाऱ्या मंत्र्यांचे पाय धरले, ही लाचारी स्व. अनिलभैय्यांच्या विचारांना काळिमा फासणारी आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत ओरिजनल शिवसेना (Original Shivsena) सोडणार नाही,” असा ठाम निर्धार नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

ही बातमीही वाचा : वडिलांच्या हिंदुत्वाच्या वारशासाठी बंड ! विक्रम राठोड ठाकरे गटातून बाहेर, थेट शिंदे गटात 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !