येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena UBY) गटाला मोठा राजकीय झटका बसला आहे. युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड (Vikram Anilbhaiyya Rathod) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुण्यात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विक्रम राठोड यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा देत त्यांचे स्वागत केले. हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून, महापालिका निवडणुकीआधी पक्षातील अंतर्गत असंतोष (Internal Politics) पुन्हा एकदा उघड झाला आहे.
दिवंगत आमदार अनिल भैया राठोड यांनी अहिल्यानगरमध्ये पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या विचारांवर (Hindutwa Agenda) भक्कम संघटन उभे केले होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी भरून काढण्याची जबाबदारी विक्रम राठोड यांच्यावर होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाकडून अपेक्षित दखल न घेतल्याने आणि जबाबदाऱ्या न वाढवल्याने ते नाराज होते.
याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congress NCP) सत्तेसाठी जाताना ठाकरे गटाने हिंदुत्वाची भूमिका मवाळ केल्याचा आरोप करत, “हिंदुत्वाची धार बोथट झाली,” अशी स्पष्ट नाराजी विक्रम राठोड यांनी व्यक्त केली. तिकीट वाटपात समर्थकांवर अन्याय झाल्याचा आरोप करत अखेर त्यांनी निर्णायक पाऊल उचलले.
या प्रवेशामुळे अहिल्यानगरमधील राजकीय समीकरणे (Political Equations) बदलण्याची शक्यता असून, येत्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

