संगमनेर (अहिल्यानगर) - स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) संगमनेर शहर परिसरात पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत देशी दारूसह चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 19 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक (DSP) सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरात गस्त (Petroling ) घालत असताना, संगमनेरहून देवगडकडे चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली.
त्यानुसार प्रवरा नदीपात्रावरील (Pravara River) पुलाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित कार (Suspected Vehicle) थांबवून तपासणी केली असता, डिकीत देशी दारूचे बॉक्स (Liquor Boxes) आढळून आले.
यावेळी गणेश बारुक धामणे (वय 40, रा. इंदिरानगर, संगमनेर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत ही दारू ही उमेश सूर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल :
- देशी दारू : ₹19,520/-
- हुंदाई कंपनीची ऍक्सेंट कार : ₹2,00,000/-
- एकूण : ₹2,19,520/-
याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या केली असून, अवैध दारू व्यवसायावर प्रशासनाचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
