विठ्ठल-रुख्मिणी मंदिर चोरीचा पर्दाफाश ! 10.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील (Vitthal Rukmini Temple) गाभाऱ्यातून चांदीचे दागिने (Silver Jewelry) चोरीला गेल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) या सनसनाटी मंदिर चोरीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.

त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे गेटचे कुलूप (Lock) तोडून गाभाऱ्यातील विठ्ठल-रुख्मिणी शेजारी असलेला महादेवाचा (Mahadev) 1 किलो 873 ग्रॅम वजनाचा, 1 लाख 48 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belwandi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिर चोरीचे गांभीर्य आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (DSP Somnath Gharge) यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक (LCB PI) किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक (Investigation Team) तयार केली.

सलग चार दिवस तपास व तांत्रिक विश्लेषण (Technical Research) केल्यानंतर रेकॉर्डवरील सराईत आरोपी भास्कर खेमा पथवे (Bhaskar Pathave) व त्याचा साथीदार राजेंद्र ठकाजी उघडे (Rajendra Ughade) यांना टाकळीढोकेश्वर (Takali Dhokeshwar) परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींनी आणखी एक साथीदार संजय भास्कर गावडे (फरार) याच्यासह मंदिर चोरी केल्याची कबुली दिली. अटक आरोपींकडून चांदीचा मुखवटा, मोबाईल फोन, रोख रक्कम, चोरीसाठी वापरलेली हत्यारे तसेच तवेरा चारचाकी वाहन असा एकूण 10.52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी भास्कर पथवे हा कुख्यात सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी राजेंद्र उघडे याच्यावरही यापूर्वी मंदिर चोरीचे गुन्हे नोंद आहेत. अटक आरोपींना पुढील तपासासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !