येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन (Injection) व बॉटल विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मध्यरात्री छापा (Raid) टाकला. या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 हजार 613 रुपये किमतीचा नशेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (DSP Somnath Gharge) यांच्या आदेशानुसार नशेचे पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास महत्त्वाची माहिती मिळाली.
बागडपट्टी परिसरात सिध्देश्वर मंदिराजवळ (Siddheshwar Mandir) एक इसम डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असलेली औषधे व नशेची इंजेक्शन्स/बॉटल्या कुरिअरद्वारे (Courier) मागवून विक्रीसाठी थांबला असल्याचे समजले. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत संशयित इसमाला ताब्यात घेतले.
त्याचे नाव रोहित रघुनाथ वंगार (वय 25, सिध्देश्वर मंदिराजवळ, बागडपट्टी, अहिल्यानगर) (Rohit Raghunath Wangar) असल्याचे सांगितले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉटल आढळून आल्या. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
- नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉटल - 37
- एकूण किंमत - 11,299/-
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नशेच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

