येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) मोठी कारवाई केली आहे. मिरजगाव (Mirajgaon) व खर्डा (Kharda) पोलीस स्टेशन हद्दीतून तब्बल 82 लाख 40 हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक (Arrest), तर काही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
दिनांक 20 व 21 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापे (Raid) टाकत अवैध वाळू उत्खनन (Illegal Sand Mining) व वाहतूक उघडकीस आणली. मिरजगाव हद्दीत नदीपात्रातून जेसीबी (JCB) व ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू असताना छापा टाकला. तर खर्डा परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहाथ पकडण्यात आला. संबंधितांकडे कोणताही वैध परवाना (Legal Certificate) नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
- संदीप अशोक जाधव (रा. खडकत, ता. आष्टी)
- नितीन केरबा कापरे (रा. नागलवाडी, ता. कर्जत)
- अलम निजामुद्दीन शेख (मूळ रा. उत्तर प्रदेश)
- योगेश अण्णा सुरवासे (रा. खर्डा, ता. जामखेड)
- अजय खेडर (रा. सांगवी, ता. आष्टी)
- ऋषिकेश खेडकर (रा. सांगवी, ता. आष्टी)
- संभाजी बाबुराव बांदल (रा. नागलवाडी, ता. कर्जत)
- धनंजय बांदल (रा. नागलवाडी, ता. कर्जत)
- 2 जेसीबी - 50 लाख रु.
- 3 ट्रॅक्टर-ट्रॉली - 4 लाख रु.
- 1 ट्रॅक्टर-ट्रॉली (खर्डा) - 8 लाख रु.
- 4 ब्रास वाळू - 40 हजार रु.
- एकूण - ८,४०,००० रु.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) व पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3/15 अंतर्गत मिरजगाव व खर्डा पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
अवैध वाळू व्यवसायाविरोधात कारवाई पुढेही सुरूच राहणार, असा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

