नोकरीच्या शोधात आहात? विमा सल्लागार भरतीसाठी थेट मुलाखती


परभणी - परभणी डाक (Post) विभागामार्फत डाक जीवन विमा (पी.एल.आय) व ग्रामीण डाक जीवन विमा (आर.पी.एल.आय) योजनेंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे (Interview) निवड करण्यात येणार आहे.


यासाठी आवश्यक अर्ज डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी (Central Post Office) विभाग, परभणी (Parbhani) येथे उपलब्ध आहेत.

पात्रता अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवाराचे वय (Age) मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. सदर परीक्षा केंद्रीय (Central) किंवा राज्य शासन (State Government) मान्यताप्राप्त असावी.

बेरोजगार (Unemployed) किंवा स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक (Retired Teacher), अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य इत्यादी उमेदवार टपाल जीवन विम्यासाठी थेट (Application) अर्ज करू शकतात.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विमा विषयक ज्ञान, संगणकाचे ज्ञान (Computer Knowledge) तसेच स्थानिक भागाची माहिती आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम एन.एस.सी. किंवा के.व्ही.पी. स्वरूपात असेल. प्रशिक्षण (Training) पूर्ण झाल्यानंतर डाक विभागामार्फत तात्पुरता परवाना देण्यात येईल.

आय.आर.डी.ए.ची परवाना परीक्षा (License Exam) उत्तीर्ण झाल्यानंतर तो कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती लायसन्स तत्त्वावर व कमिशन तत्त्वावर (Commission Basis) करण्यात येणार आहे.

मुलाखतीची माहिती सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत अधिक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी 431401 येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीस येताना आवश्यक आहे
  • बायोडाटा
  • मूळ कागदपत्रे
  • प्रमाणपत्र किंवा
  • अनुभव प्रमाणपत्र.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !