न झुकणाऱ्या लेखणीचा गौरव : मराठी पत्रकार दिन


६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा ठेवा आहे. मराठी भाषेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर  (Balshatshri Jambhekar) यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ (Darpan) सुरू केले.


योगायोगाने जांभेकर यांचा जन्मदिनही हाच. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन (Marathi Patrakar Diwas) म्हणून घोषित केला.

गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या सहकार्याने जांभेकरांनी ‘दर्पण’ची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी वृत्तपत्राची संकल्पनाच जनमानसात रुजलेली नव्हती. तरीही पदरमोड करून, अपार जिद्दीने हे वृत्तपत्र (Newspaper) समाजात पोहोचवले गेले.

इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिक जनतेच्या अडचणी, भावना आणि प्रश्न कळावेत, यासाठी ‘दर्पण’मध्ये विशेष स्तंभ लिहिले जात. १८४० पर्यंत चाललेल्या या वृत्तपत्राने मराठी पत्रकारितेची दिशा ठरवली. त्या काळातील निर्भय संपादकांमध्ये बाळशास्त्री जांभेकर अग्रणी होते.

पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी (News) देणे नव्हे; ती सत्यासाठी उभे राहण्याची धैर्यशील भूमिका (Stand) आहे. सत्य बोलणे सोपे असते, पण सत्यासाठी रोज उभे राहणे हे धैर्याचे काम असते आणि हे धैर्य अंगीकारणारा माणूस म्हणजे पत्रकार (Reporter). समाज झोपलेला असताना जो जागा असतो, अन्यायावर बोट ठेवतो, प्रश्न विचारतो, तोच खरा पत्रकार.

कधी उपेक्षा, कधी टीका, कधी धोके, तरीही हातातील पेनाची धार बोथट होऊ न देता पत्रकार लिहित राहतो. कारण आज न लिहिलं तर उद्या इतिहास मौन धरेल, याची त्याला जाणीव असते. सत्तेच्या झगमगाटात सत्य हरवू नये म्हणून तो प्रकाश बनून उभा राहतो.

पत्रकार सामान्य माणसाचा आवाज (Commen Mans Voice) होतो. अश्रूंना शब्द देतो, वेदनांना व्यासपीठ देतो आणि समाजाला आरसा दाखवतो. कधी न बोलणाऱ्यांचे बोलणे तो ऐकू देतो, हीच खरी पत्रकारिता.

६ जानेवारीचा दिवस म्हणजे त्या न झुकणाऱ्या, निर्भय लेखणीला सलाम. सत्यासाठी झगडणाऱ्या, समाजासाठी लढणाऱ्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची लेखणी सदैव निर्भय राहो आणि सत्याची वाट कधीही हरवू नये.

सत्यमेव जयते !

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
संपादक : सखीसंपदा
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !