कृष्णानगर महिला मंडळाकडून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


अहिल्यानगर - ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त (Savitribai Phule Jayanti) कृष्णानगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात कवयित्री व सैनिक पत्नी आशा साठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रभाव प्रभावी शब्दांत उलगडून दाखवला.

आशा साठे म्हणाल्या, ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज आपण लिहायला वाचायला शिकलो, त्या सावित्रीमाईंचे आपल्यावर जन्मोजन्मी न फिटणारे अनंत उपकार आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण थोर व्यक्तींना विसरतो; मात्र ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळाली, त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

यावेळी त्यांनी आपल्या स्वलिखित कवितेतून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय कार्याची महती महिलांसमोर मांडली.

चूल आणि मुल होती
एवढीच बाईची ओळख…
फुले दाम्पत्याने केली होती
स्त्रीजातीची पारख…

अशा प्रभावी ओळींनी उपस्थित महिलांची मने जिंकली. समाजाच्या विरोधाला, शिव्याशापांना आणि अपमानाला तोंड देत फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला केला, हे त्यांनी कवितेतून अधोरेखित केले.

कार्यक्रमास महिला मंडळातील कविता नांगरे, जयश्री सवासे, वंदना रणदिवे, कविता महाजन, प्रणाली मते, अनुजा नांगरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान आणि त्यांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली उपयुक्तता अधोरेखित झाली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !