सावित्रीबाई फुले यांचे प्रशिक्षण झालेल्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन आवश्यक - न्यायमूर्ती योगेश पैठणकर


अहिल्यानगर - मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन (Urjita Social Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा जाधव-बंडेलू यांना (Nilima Jadhav Bandelu) ‘वारसा सावित्रीचा’ पुरस्कार (Award) २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.

जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथील जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या (Clera Bruce Highschool) सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी मिशनच्या (Marathi Mission) अध्यक्षा डॉ. विजया जाधव होत्या.

यावेळी भारत सरकारच्या जीएसटी व कस्टम्स विभागाचे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. सुभाष भोर, मानवाधिकार अभियानचे (Human Rights) प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, उर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे, प्रा. सॅम्युएल वाघमारे, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Phule) यांच्या स्त्री शिक्षणातील क्रांतिकारक कार्याचा आढावा घेतला. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे प्रारंभीचे प्रशिक्षण अहमदनगर येथील मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये झाले आहे.

या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष अतिथी ॲड. सुभाष भोर यांनी नीलिमा जाधव-बंडेलू यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद करत, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या महिलांचा सन्मान होणे हेच खरे अभिवादन असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजया जाधव यांनी मिशनरी संस्थांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत, समाजातील विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. पुरस्कार स्वीकारताना नीलिमा जाधव-बंडेलू यांनी आभार व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा ऐतिहासिक संदर्भांसह आढावा घेतला.

संध्या मेढे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ॲड. संतोष गायकवाड यांनी ‘वारसा सावित्रीचा’ (Varsa Savitricha) पुरस्काराची भूमिका स्पष्ट केली. आभार प्रदर्शन भैरवनाथ वाकळे यांनी केले.

यावेळी युनूसभाई तांबटकर, अशोक सब्बन, शिवाजीराव नाईकवाडी, सत्यशील शिंदे, कमलाकर देढे, ॲड. बेबी बोर्डे, प्रा. प्रियदर्शन बंडेलू यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !