विजय-रश्मिका रोम ट्रिपवर एकत्र.? व्हायरल फोटोंमुळे लग्नाच्या चर्चेला उधाण

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

मनोरंजन - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विजय देवरकोंडाने इटलीतील रोम ट्रिपचे (Rom Ttreep) काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आणि त्यानंतर लग्नाच्या चर्चेला (Gossip) जोरदार हवा मिळाली आहे.

या फोटोंमध्ये विजय एकटाच दिसत असला, तरी एका छायाचित्रात फुलांचा गुच्छ हातात धरलेली मुलगी दिसते, जी चाहत्यांच्या मते रश्मिकाच आहे. विजयने शेअर केलेल्या सहा फोटोंमध्ये ट्रेन प्रवास, रोमच्या रस्त्यांवरील भटकंती (Travel) आणि तिथले सौंदर्य दिसते. मात्र, चाहत्यांचे लक्ष वेधले ते रश्मिकासारख्या दिसणाऱ्या झलकांकडे.

हा फोटो पाहताच सोशल मीडियावर “लग्न कधी?” अशा कमेंट्सचा (Comments) पाऊस पडू लागला आहे. दरम्यान, विजय आणि रश्मिका यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. आता तर 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर (Udaypur) येथे हे जोडपे लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा केला जात आहे.

काही माध्यमांतील वृत्तांनुसार, हे लग्न एका भव्य पॅलेसमध्ये, अगदी खासगी स्वरूपात होणार असून केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. लग्नानंतर हैदराबादमध्ये इंडस्ट्रीसाठी रिसेप्शन (Reception) होण्याचीही शक्यता आहे.

याआधी ऑक्टोबरमध्ये साखरपुड्याच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र विजय आणि रश्मिका दोघांनीही यावर कधीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रश्मिकाने एका मुलाखतीतही लग्नाच्या चर्चांवर 'योग्य वेळ आल्यावरच बोलेन' असे सांगत गूढ कायम ठेवले आहे.

‘गीता गोविंदम’ (Geeta Govindam) आणि ‘डियर कॉम्रेड’ (Dear Comrade) मधील हिट केमिस्ट्रीनंतर आता चाहते या रील जोडीला रिअल लाईफमध्ये (Real Life) एकत्र पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !