राजकीय पार्श्वभूमी नाही? हरकत नाही ! तुम्हीही होऊ शकता 'नगरसेवक'

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

नाशिक : शहराच्या विकासासाठी सक्षम, तज्ज्ञ आणि प्रामाणिक व्यक्तींना महानगरपालिकेत स्थान मिळावे यासाठी आता व्यापक जनजागृती मोहीम (Awareness Campaign) उभी राहत आहे.

Image : Ai Generated

महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिका (Municipal Corporation) अधिनियमांतील तरतुदी व दि. २८ फेब्रुवारी २०१२ च्या राजपत्रातील नियमांच्या आधारे स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक पदावर राजकीय निष्ठेपेक्षा तज्ज्ञता, अनुभव आणि समाजासाठी केलेले प्रत्यक्ष काम यांना प्राधान्य देण्याची स्पष्ट भूमिका पुढे येत आहे.

डॉक्टर (Doctor), वकील (Advocates), अभियंते (Engineers), चार्टर्ड अकाउंटंट (CA), शिक्षक (Teachers), साहित्यिक तसेच खरे आणि सातत्याने काम करणारे समाजसेवक (Social Workers) यांनी आता मागे न राहता शहराच्या निर्णयप्रक्रियेत (Decision Making) सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'राजकीय पार्श्वभूमी (Political Background) नसली तरी चालते. पण समाजासाठी केलेले काम आणि प्रामाणिक अनुभव असणे गरजेचे' असा ठाम संदेश या मोहिमेतून दिला जात आहे. संबंधित नियमांनुसार सामाजिक, शैक्षणिक (Educational), प्रशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून नामनिर्देशनाची संधी उपलब्ध आहे.

शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेले शिक्षक, प्राध्यापक, प्रशासनाचा अनुभव असलेले अधिकारी (Skilled Officers), समाजहितासाठी सातत्याने काम करणारे कार्यकर्ते तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना (Expert Personalities) या पदासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वीकृत नगरसेवकांचे नामनिर्देशन महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून केले जाते. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व संबंधित प्राधिकरणांच्या सल्ल्यानुसार पात्र उमेदवारांची नावे शासनाकडे पाठविली जातात आणि शासनाच्या मान्यतेनंतर अंतिम नियुक्ती होते.

त्यामुळे पात्र नागरिकांनी स्वतःची पात्रता, अनुभव आणि कार्याचा ठोस पुरावा सादर करून प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. 'शहराच्या विकासाचे निर्णय केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे तर ज्ञान, अनुभव आणि समाजाभिमुख दृष्टीकोनावर आधारित असावेत,' या उद्देशाने ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहरासाठी काम करण्याची खरी इच्छा असलेल्या नागरिकांनी निष्क्रिय न राहता तातडीने पुढाकार घ्यावा, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपला दावा मजबूत करावा, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !