अहिल्यानगर - मुकुंदनगर (Mukundnagar) येथील मिलन कॉलनीमध्ये राहणाऱ्या सारा शोहेब शेख (Sara Shaikh) या ५ वर्षीय चिमुकलीने कडक उन्हाची तमा न बाळगता आपला प्रथम उपवास (रोजा Roja) अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने पूर्ण केला आहे.
सारा ही शोहेब अल्ताफ शेख यांची सुकन्या असून, तिचे आजोबा अल्ताफ मोहियोद्दीन शेख (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक PSI) यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा संकल्प पूर्ण केला.
इतक्या लहान वयात जिद्द आणि चिकाटी दाखवत साराने पहाटेपासून सायंकाळपर्यंत अन्न-पाण्याशिवाय राहून आपला पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
इफ्तारच्या वेळी शेख कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. साराच्या या पहिल्या उपवासाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
