थेट लेखकांशी गप्पा मारत विद्यार्थ्यांनी साजरा केला ‘मराठी भाषा गौरव दिन’


​शेवगाव (अहिल्यानगर) - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Din) संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा केला जातो. मात्र, तालुक्यातील भापकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या दिवसाचे औचित्य साधून एक अतिशय अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला.

या शाळेतील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी थेट प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड (Child Literature) यांच्याशी फोनवरून संवाद साधत मराठी भाषेतील साहित्याचा आनंद घेतला. ​लेखकांशी थेट संवाद करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला.

शाळेतील शिक्षकांच्या कल्पकतेतून ही अनोखी संधी उपलब्ध झाली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आव्हाड यांच्याशी त्यांच्याच ‘माझ्या या दारातून कोण कोण येते’ या कवितेवर (Poem) आधारित गप्पा मारल्या, तर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘ढगांच्या देशात’ या कवितेतील आपल्या शंका त्यांना विचारल्या.

पाठ्यपुस्तकात ज्यांच्या कविता वाचल्या, त्याच लेखकाशी थेट बोलता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ​(Happy) लेखकाकडून (Writer) शिक्षकांच्या कल्पकतेचे (Teachers Innovative Idea) कौतुक करण्यात आले.

मुंबईस्थित साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त (Academy Award Winner) बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनीही शालेय विद्यार्थ्यांशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी त्यांच्या कुतूहलाचे निरसन केले.

यावेळी आव्हाड म्हणाले, या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कल्पकता आणि इच्छाशक्ती पाहून खरोखरच कौतुक वाटते. मुलांनीही अतिशय सुंदर प्रश्न विचारले. अशा उपक्रमांमुळे मुलांचे संभाषण कौशल्य आणि भाषेबद्दलची गोडी निश्चितच विकसित होईल.

शाळेच्या मुख्याध्यापिका आरती तागडे आणि सहशिक्षिका श्रीकांता शिंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे शिक्षण वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन लेखकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास (Confidence) वाढण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमाबद्दल गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, केंद्र प्रमुख रघुनाथ लबडे, रोहिदास बोडखे आणि सलीम सय्यद यांनी शाळा व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !