येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
पुणे : नाटक आणि साहित्याची आवड जोपासणाऱ्या नवोदित लेखकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. 'तुमचं आमचं' (Tumch Aamch) या संस्थेच्या वतीने भव्य 'एकांकिका लेखन स्पर्धेचे' (Competition) आयोजन करण्यात आले आहे. दर्जेदार संहितांना प्रोत्साहन देणे आणि नवीन लेखकांना व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश (Aim) आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे (Cash Awards) जाहीर करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छूक स्पर्धकांनी आपली एकांकिका 'पीडीएफ' (PDF) स्वरूपात पाठवायची आहे.
एकांकिका स्पर्धेचा तपशील :
- अंतिम तारीख : १० एप्रिल २०२६
- प्रवेश शुल्क : २५० रुपये मात्र.
- संपर्क : अधिक माहितीसाठी आणि प्रवेश निश्चितीसाठी राकेश इंगवले (९१३०८४०६८१) किंवा कृष्णा वाळके (९६०४१२६७०५) यांच्याशी संपर्क साधावा.
आपल्यातील सुप्त लेखकाला वाट करून देण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लेखकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

