येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या (New English School) इयत्ता १० वी १९८८ बॅचचा स्नेहमेळावा महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त (Workers Day) शहरात उत्साहात पार पडला. तब्बल ३६ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी (Ex Students) शालेय आठवणींना उजाळा देत निखळ मैत्रीचा आनंद लुटला.
या मेळाव्यात केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता, सामाजिक बांधिलकी जपत कामगार दिनानिमित्त हॉटेलमधील सर्व कामगारांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाने उपस्थित कामगार भारावून गेले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, उद्योजक रामराव मुनफन, सेवानिवृत्त मेजर रवींद्र नाईक, शिरीष गायकवाड, अरुण कुंजीर, रामदास इंगळे, दामोधर भालसिंग, वसंत कासार, राजेंद्र निमसे, हरिचंद्र माने, विनायक इंगळे, पोपट बाचकर, दादा पडवळकर, सुरेश जासुद, संगिता मते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनप्रवासाची (Life Journey) माहिती दिली. शालेय जीवनातील गमतीजमती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांबद्दल बोलताना वातावरण भावुक व आनंददायी बनले होते.
विजय भालसिंग म्हणाले, १९८८ मध्ये शाळा सोडल्यानंतर प्रत्येकाचा प्रवास वेगळा राहिला. आज आपण विविध क्षेत्रांत यशस्वी आहोत, याचे श्रेय शाळेने दिलेल्या संस्कारांना (Moral) आहे. जगात लहान-मोठा किंवा श्रीमंत-गरीब असा भेद असू शकतो, पण माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म (Religion) नाही. कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
उद्योजक रामराव मुनफन, सेवानिवृत्त मेजर रवींद्र नाईक, शिरीष गायकवाड व रामदास इंगळे यांनीही मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मैत्री आणि आपुलकीचा नवा विश्वास घेत या मेळाव्याची सांगता झाली.
