तलवारीच्या जोरावर कधी न्याय होतो का?


लोके भवाञ्जगदिन: कलयावतीर्ण:
सद् रक्षणाय खलनिग्रहणाय चान्य:
कश्चित् त्वदीयमति निदेशमीश
कश्चित् त्वदीयमतियात निदेशमीश
जन: स्वकृतमृच्छति तन्न विद्म: ॥२७॥


अर्थ : "हे जगदीश्वरा! आपण या जगामध्ये साधु-संतांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना शासन करण्यासाठी अंशात्मक रूपाने अवतार घेतला आहे. असे असताना, हे प्रभो! एखादा राजा तुमच्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दुःख देत आहे. हे सर्व नक्की का घडत आहे, ते आम्हाला समजत नाही."

जरासंधाची कैद आणि श्रीकृष्णाचा न्याय (Story of Shri Krishna & Jarasandha) - मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज 'जिजी' हा श्रीमद्भागवतातील श्लोक का सांगत आहे? यामागे एक कथा आहे, ती आज तुम्हाला सांगते.

एकदा श्रीकृष्ण सकाळी दरबारात आले असताना एक दूत जरासंधाची तक्रार घेऊन तिथे आला. जरासंधाने आपल्या दिग्विजय मोहिमेदरम्यान जे २०,००० राजे शरण आले नव्हते, त्यांना बंदी बनवून ठेवले होते. त्या दुःखी राजांच्या वतीने तो दूत आलेला असतो.

तो भगवंताची स्तुती करत त्या राजांची व्यथा मांडतो, "हे प्रभो! राजोपभोगाचे सुख हे स्वप्नवत आणि क्षणभंगुर (temporary) आहे. तरीही आम्ही या भयभीत आणि नाशवंत शरीराने ते ओझे वागवत आहोत. आमची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली आहे. आम्ही अकारण हे कष्ट भोगत आहोत.

हे द्वारकाधीशा! आपण शरणागतांचे दुःख नष्ट करता, म्हणूनच आपण आम्हाला या जरासंधाच्या बंधनातून सोडवावे. त्याला एकट्याला दहा हजार हत्तींचे बळ आहे आणि त्याने आम्हाला मेंढरांसारखे बंदिस्त करून ठेवले आहे."

ब्रीदवाक्याचा अर्थ आणि पोलिसांचे कर्तव्य (Motto & Duty of Police) -  कंसाच्या वधाचा सूड घेण्यासाठी जरासंधाने जवळपास १७ वेळा श्रीकृष्णावर हल्ला केला होता. परंतु, प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने पराभूत जरासंधाला सोडून दिले होते.

पुढे युधिष्ठिराच्या 'राजसूय यज्ञा'च्या वेळी जरासंधाच्या कैदेतून मुक्त केलेले सर्व राजे पांडवांचे मांडलिक बनले. यामुळे चिडून जरासंधाने पुन्हा श्रीकृष्णाविरुद्ध युद्ध पुकारले. शेवटी श्रीकृष्णाने भीमाच्या साहाय्याने जरासंधाचा वध केला. या पार्श्वभूमीवर वरील श्लोकाचा अर्थ समजून घ्यायला हवा.

श्रीकृष्णाचा अवतार हा मुळातच दुष्टांचा नाश करून सज्जनांच्या रक्षणासाठी झाला होता. युक्ती, प्रयुक्ती आणि चतुराईने, नातेगोत्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आयुष्यभर एकेक करून दुर्जनांचा नाश केला. त्या शृंखलेतीलच हा जरासंधाचा वध होता.

याच विचारातून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलिसांसाठी 'सद् रक्षणाय खलनिग्रहणाय' (सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश) हे ब्रीदवाक्य अंगीकारले आहे. खरोखरच हे अतिशय समर्पक आणि सार्थक ब्रीद आहे. पोलीस दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यबद्ध असतात.

पण सद्यस्थिती आणि मनातील अस्वस्थता (Current Situation & Social Concerns) काय आहे? पण मग सध्या हे काय चालले आहे..? निष्पाप आणि निरपराध कोवळ्या मुलांना झोडपून काढणे.. ही आहे का त्यांची कर्तव्यनिष्ठ मनोवृत्ती? कालपासून मन अत्यंत अस्वस्थ (disturbed) आहे.

आता हे उच्च अध्यात्मिक ब्रीदवाक्य बदलून 'खलरक्षणाय सद् निग्रहणाय' (दुष्टांचे रक्षण आणि सज्जनांचा छळ) असे उलटे होऊ नये, एवढीच एक आई म्हणून माझी इच्छा आहे!

त्याचप्रमाणे दिल्ली पोलिसांचे ब्रीदवाक्य 'शांती, सेवा, न्याय' (Peace, Service, Justice) हे आहे. यावर आता काय बोलावे? तुम्हीच सांगा... कुठे आहे शांती? ही कुठली सेवा देण्याची पद्धत? न्यायाच्या डोळ्यांवरची पट्टी काढून टाकली आहे आणि दुसऱ्या हातात तलवार दिली आहे.

पण तलवारीच्या जोरावर कधी न्याय होतो का? हा देश महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि गौतम बुद्धांचा देश आहे. करुणा आणि शांततेच्या (Ahimsa & Peace) मार्गाने चालणारा हा देश आहे. पण आज कुठे दिसतोय का न्याय, सेवा आणि शांती...? 😷

रामाचे नाव घेतले जाते, पण राम म्हणजे 'नम्रता' (Humility)! ती नम्रता आज कुठे दिसतेय का, तेच मी शोधतेय.. आपल्या मुलांच्या जगण्यात अखंड 'राम' (सद्विचार व नीतिमत्ता) टिकून राहो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना! बा पांडुरंगा, ऐकतोस ना...!

- स्वप्नजा घाटगे, कोल्हापूर

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !