मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक..!
चिमुकल्या पोरांच्या
पाठीवर उमटताहेत...
काठ्यांचे वळ..
पहाताय ना थंड नजरेने...
मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक...!!
भविष्याच्या चिंध्या
पाहून आक्रोश बघताय ना,
मला काय त्याचं म्हणून
चॅनेल स्क्रोल करताय ना..
मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक..!
सुरक्षित भविष्य मागताहेत,
चिमुकली उघड्यावर आलीत,
आईबाबांच्या पंखाखालून...
मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक..!
उद्या इतिहास विचारेल,
"तुम्ही तेव्हा कुठे होता?"
उत्तर द्यायला शब्द नसतील...
कारण ओठांवर फक्त मौन होतं.
मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक..!
आज मौन साजरं करताय,
उद्या हाच आक्रोश
तुमच्या दाराशी येईल...
तोवर... मौन मुबारक मंडळी,
मौन मुबारक..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

