चोरी करणाऱ्या तिघांपैकी दोघांनी त्यांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. परंतु एकाचा चेहरा मात्र तसाच होता. तो सिसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. लवकरच या आरोपींना जेरबंद केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.