अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी १२ रुग्ण

अहमदनगर - आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील ६ कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे झाले म्हणून आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे.


नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवक कोरोना बाधित आढळले आहेत. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळली आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने तो उपचारासाठी दाखल झाला. संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळले.

श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल केले होते. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे. ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आला आहे. तो मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.

कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला आहे. तो मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते, अशी माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांनी दिली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !