अहमदनगर - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष आकाश भाऊ भोसले यांनी श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील बाहेरून आलेल्या अनाथ व्यक्तीला स्नान घालून तसेच त्या व्यक्तीस कपडे देऊन एक प्रकारची चांगली समाजसेवा केली.
त्यांच्या हातून अशीच चांगली समाजसेवा घडो, अशी शुभेच्छा त्यांच्या मित्र परिवाराने दिली आहे. आकाश भोसले यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न तर सोडवत आहेतच. पण आपल्या समाजिक जाणिवा आणि संवेदनशीलपणा देखील दाखवून दिला आहे.