अहमदनगर - नगर तालुक्यातील इमामपूर गावात गर्भगिरीच्या कुशीत एका खिरणीच्या झाडाखाली महादेवाचे मंदिर आहे. येथे योगेश्वर महादेवाच्या पिंडीवर दर सोमवारी अभिषेक आणि पूजा केली जाते.
घोडेगाव येथील शिवभक्त कृष्णाभाऊ फुलमाळी यांनी ही पुजा आणि अभिषेक सुरु केला. आता इतर शिवभक्त दर सोमवारी येथे मनोभावे पूजा आणि अभिषेक करून आरती करतात.
सध्या पावसामुळे हा परिसर हिरवा गर्द शालू पांघरून नटलेला आहे. या परिसरात मनःशांती देखील मिळते. त्यामुळे अनेक शिवभक्त या परिसरात महादेवाच्या दर्शनाला येतात.