अहमदनगर - शहरात पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. रविवारी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अहमदनगर शहरात गेले काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. पण काही नागरिक मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे अशा नागरिकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. कोतवाली तसेच तोफखाना पोलिसांनी संयुक्त पणे तपासणी मोहिम राबवून मास्क नसलेल्या वाहनचालकानावर दंडात्मक कारवाई केली.