माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना तत्परतेने सेवा

मुंबई - सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह ॲप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहज उपयोग करता येईल हे पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या व्यवस्थेवर मुख्यमंत्री सचिवालयाची देखरेख राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी आढावा घेतला. तसेच महानेटद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्याशी देखील संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवासन, व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, संचालक रणजित कुमार उपस्थित होते.

 वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील धवसा ग्रामपंचायत इथे महानेटद्वारे दूरदृश्य प्रणालीतून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाविषयी विचारले. चंद्रपूर येथे देखील त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांना ई लर्निंग अनुभवांविषयी विचारणा केली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !