वाळू तस्करांची मुजोरी : जबाबदार दोघेही

बंदच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नम्र निवेदन. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मित्रांनो आपण सर्व एकाच व्यवस्थेचे भाग आहोत.  आजपर्यंत आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शासनाचे काम सोबतीने करत आहोत. वाळू तस्करी रोखणे व वाळू तस्करांना वेळीच मुसक्या आवळल्या हे दोन्ही विभागाचे तेवढ्याच जबाबदारीचे काम आहे. 

आपण सर्व आपले काम करत असताना, वाळू तस्करांकडून नेहमीच जीवघेणा हल्ला होतो हे आपण दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यापुर्वीही अनुभवलेले आहे. महसूलचे अधिकारी कर्मचारी किंवा पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण पण हल्ला झाल्यानंतर जागे होतो व तेवढ्यापुरते किंवा त्या केवळ घटने पुरते मर्यादित पाहून, आरोपी अटकेची मागणी करतो व आरोपी अटक झाल्यानंतर पुढे त्याचे काय होते, हे आपल्या दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्यापैकी माहित आहे. 

वाळू तस्करी रोखणे किंबहुना वाळू तस्करी कायमस्वरूपी बंद होणे, याकरिता दोन्ही विभाग प्रमुख वेळोवेळी हजारो परिपत्रके काढत असतात. यामध्ये बैठकाही होतात. बैठकांमध्ये महसूल विभागाला कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरवावा, असेही ठरले जाते, तरी दोन्ही विभाग आपापल्या स्तरावर व स्वतंत्ररीत्या कारवाई करण्यासाठी प्राधान्य देतात. याचे कारण खाजगी आहे की एकमेकांवरचा अविश्वास, हा सुद्धा या निमित्ताने संशोधनाचा विषय आहे.

मागच्या आठ दिवसापूर्वी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. व या हल्ल्याच्या निमित्ताने आपण पण आंदोलने, धरणे व लेखणी बंद आंदोलन आणि हे काम बंद आंदोलन करत आहात. आपल्या भावना आम्ही समजू शकतो व आपल्या आंदोलनाचा आदरही करतो. परंतु आपणही थोडे आत्मपरीक्षण करावे व पोलीस विभागाने अशा वाळू तस्करांच्या आपल्याकडे पाठवलेले तडीपारीचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा 56 असतील, एमपीडीए प्रपोजल किंवा सीआरपीसी प्रमाणे चाप्टर  केसेस असतील. 

यामध्ये काही ना काहीतरी त्रुट्या काढून सदर प्रस्ताव आपण खारीज करता. त्यामुळे अशा आरोपींना वेळीच प्रतिबंध करता येत नाही व त्यामुळे त्यांची मुजोरी वाढत चालते. उमरखेड मधील त्या गुन्ह्यातील एकूण आठ आरोपींपैकी सात आरोपी अटक केलेले आहेत. त्यांचा दहा दिवसापासून पोलिस कस्टडी रिमांड सुरू आहे. फरार आरोपी अविनाश चव्हाण याला अटक करणेकरिता सर्व राज्यभर प्रयत्न सुरू आहेत. 

परंतु केवळ तो एक आरोपी अटक करून आपले समाधान होत असेल तर संप खुशाल चालू ठेवा. पण एमपीएससी परीक्षेत एखादा गुण कमी जास्त असल्यामुळे आपण महसूल विभागात आहात व आम्ही पोलिस विभागात आहोत हे लक्षात असू द्या. एक पोलीस अधिकारी म्हणून मी आज आपणाला विनंती करतो, आपण पण या घटना कडे, ती केवळ एक घटना अशी न पाहता संपूर्ण राज्यभर या दोन्ही विभागांनी अशा अवैध व्यवसाय मधले गुंतलेले गुन्हेगार यांचे विरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना वेळीच रोखणे ही काळाची गरज आहे. 

आपण आंदोलन थांबवून सामान्य जनतेचे सेवक आहोत ही जबाबदारी ठेवून पुन्हा कामावर परत या व सामान्यांची   सेवा करा अशी विनंती करतो. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने तो अटकेपासून वाचण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करत आहे पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. आपण कृपया एक सहकारी पोलीस विभाग हा आपला मित्र आहे, आपला कायमचा सोबती आहे आणि आपल्या मित्राला पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याला त्यांची संघटना नसल्याने त्यांना संप करता येत नाही, याची सुद्धा जाणीव ठेवून तुमचा संप थांबवा, ही विनंती.


- आपला कायमच सोबत असलेला 

पोलीस विभागातील अधिकारी

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !