सावधान ! तुम्हालाही 'व्हॅलेंटाईन डे' ऑफर्सचा मेसेज आलाय..?

मुंबई : प्रेमाचा उत्सव म्हणून 14 फेब्रुवारीला जगभर साजरा होणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या च्या पार्श्वभूमीवर ऑफर्सच्या लिंक पाठून हॅकर्स आपल्या सावजाला हेरण्याच्या तयारीत आहेत. अशा फसव्या मेसेजला रिप्लाय दिल्यासतुमच्या व्हेलेंटाईन डे च्या आनंदावर विरजण पडलंच म्हणून समजा.


अशा खोट्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञही देतात. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करताना मुबई पोलिसांनी सांगितली कि, मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये कुटुंबासह सात दिवस मोफत राहण्याची सोय. अशा प्रकारच्या गिफ्ट कार्डचा मेसेज जर तुम्हालाही आला असेल तर सावधान.

त्याखाली असलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करु नका. कारण तुम्ही ही लिंक ओपन केली की तुम्ही उद्ध्वस्त झालाच म्हणून समजा. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो. तुमचं बँक अकाऊंटही रिकामे होऊ शकते.  अशाप्रकारच्या ऑफरच्या लिंकशी आमचा काहीही संबंध नसल्याचे ताज हॉटेलनेही स्पष्ट केले आहे.

व्हॅलेंटाईन डे अथवा कोरोना लसीकरणचे निमित्त साधून सायबर गुन्हेगार आपले  सावज हेरण्यासाठी नवनवे फंडे वापरून फेक लिंक पसरवू लागले आहेत.त्यामुळे मोबाईल धारकांनो सावध रहा आणि स्वतःची आणि इतरांचीही फसगत होण्यापासून वाचा.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !