नाशिक : हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांना पाथर्डी फाटा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याची घटना नाशिक मध्ये उघडकीस आली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी विद्यार्थ्यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला त्यानंतर सामजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी या विद्यार्थ्यांची सुटका केली.
हॉटेल व्यवस्थापनाने ११ हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. मारहाण झाल्याचेही बोललेजात आहे. या पैकी एका युवतीने शिवसेनेच्या एका पदाधिकार्यास फोन करून हा प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलवर धाड टाकली असता या ११ विद्यार्थ्याची सुटका करण्यात आली.
हॉटेल व्यवस्थापन आम्हाला राबऊन घेत होते. त्यामुळे आम्हाला येथे काम करायचे नसून आम्हाला गावाकडे जायचे आहे, अशी व्यथा या विद्यार्थ्यानी व्यक्त केली.
हॉटेलवर कारवाई नाही
अशा प्रकारे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याना डांबून ठेवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मात्र तरी देखील या विद्यांर्त्यांना डांबून ठेवणार्या हॉटेल वर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष.