मुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुबंईत केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. कारवाईत ५० टक्के तेल भेसळयुक्त असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर वापरत असलेल्या स्वस्तातल्या खाद्यतेलांवर शंका उपस्थित झाली आहे.
याप्रकरणी आठ उत्पादकांवर कारवाई करण्यात आलीय. तर 4 कोटी 98 लाख रुपयांचा तेलसाठा जप्त करण्यात आलाय. एफडीएने केलेल्या कारवाईत खाद्यतेलात ५० टक्के तेल भेसळयुक्त असल्याचं उघड झाले आहे. तुम्ही खाता ते खाद्यतेल भेसळयुक्त आहे का ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.